शाळेमध्ये वर्गखोल्या या प्रशस्त व हवेशीर आहेत. बेंचेससह उत्तम बैठकव्यवस्था वर्गामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रशस्त खिडक्यांमुळे वर्गखोल्यांमध्ये भरपूर प्रकाश व हवा खेळती राहण्यास मदत होते.
बोलक्या भिंती
शालेय प्रवेशद्वारापाशी वातावरण निर्मितीसाठी आकर्षक बोलक्या भिंतींची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे व आकर्षक चित्रांचा समावेश करण्यात आलेला आहे.
विज्ञान व क्रीडा साहित्य
शाळेमधील प्रयोग शाळेमध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रयोग सादरीकरणासाठी मुबलक असे विज्ञान साहित्य उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना विविध खेळांची ओळख व आवड निर्माण होण्यासाठी मुबलक प्रमाणात क्रीडा साहित्य उपलब्ध आहे. शालेय क्रीडा मेळावा व राष्ट्रीय सणांमध्ये क्रीडा साहित्याचा वापर सादरीकरणासाठी केला जातो.
पिण्याचे पाणी
विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुद्ध पाण्याची उपलब्धता एक्वागार्डद्वारे करण्यात आलेली आहे. पाण्याच्या मुबलकतेमुळे पिण्याचे पाणी व वापरावयाचे पाणी याची टंचाई भासत नाही.
स्मार्टबोर्ड
आत्ताच्या डीजीटल युगाचा विचार करता शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्राचा वापर करून म्हणजेच स्मार्ट बोर्डचा वापर करून वर्गामध्ये अध्यापन केले जाते.
संगणक लॅब
इतर विषयांबरोबर ई-लर्निंग चे शिक्षण देण्यासाठी सर्व सोयींनीयुक्त सुसज्ज अशा संगणक लॅबची व्यवस्था करण्यात आलेली आहे. लॅबमध्ये एकूण २० संगणक आहेत. एका विद्यार्थ्यास एक संगणक हाताळण्यास उपलब्ध करून दिला जातो.
ग्रंथालय
विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागण्यासाठी शाळेमध्ये प्रशस्त असे स्वतंत्र ग्रंथालय उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. ग्रंथालयामध्ये गोष्टींची व बालगीतांची तसेच थोर महापुरुषांची चरित्रे, नाटके इ. पुस्तके उपलब्ध आहेत.शिक्षकांचे अध्यापन प्रभावी होण्यासाठी मार्गदर्शनपर पुस्तकांचा समावेश ग्रंथालयामध्ये करण्यात आलेला आहे.
गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत
संस्थेकडून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाते. त्यामध्ये शालेय गणवेश, बूट, शालेय साहित्य या गोष्टींचा समावेश असतो. तसेच संस्थेकडून दाननिधीच्या स्वरुपात गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते.